उच्च व तंत्र शिक्षण विभाग,
महाराष्ट्र शासन

वैद्यकीय देयक प्रतिपूर्ती प्रणाली

क्रमांक वैद्यकीय देयक प्रतिपूर्ती प्रणालीसाठी अर्ज भरताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत
१. उमेदवाराने प्राचार्यांना केलेला अर्ज.
२. परिशिष्ट-अ (चेकलिस्ट).
३. जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र.
४. रुग्णालयाचा प्रकार- खाजगी नर्सींगहोम / रुग्णालयाचे नोंदणी प्रमाणपत्र.
५. आजाराचा प्रकार (जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र).
६. शस्त्रक्रिया झाली असल्यास डॉक्टरांनी/जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित केलेला शस्त्रक्रियेचा प्रकार( आरोग्य सेवा संचालनालय १३/०२/२०२३ च्या पत्रानुसार.
७. अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी झाली असल्यास दिनांक १५/०२/२०१६ नुसार खर्चाचे वर्गीकरण (अँजिओप्लास्टी किंवा बायपास झाल्यासाठी फक्त ).
८. फॉर्म अ, ब, क व नमुना ड रक्कम रु.
९. डिस्‍चार्ज समरी.
१०. महाविद्यालय 100% अनुदानित असल्याचे प्राचार्यांचे प्रमाणपत्र.
११. अर्जदार 100% अनुदान तत्वावर पुर्णवेळ कायमस्वरुपी कार्यरत असल्याचे प्राचार्यांचे प्रमाणपत्र.
१२. देयकाच्या मंजुरीसाठी शिफारस असल्याचे सहसंचालकांचे प्रमाणपत्र.
१३. अधिकारी / कर्मचारी यांचे सेवार्थ प्रणालीवरील वेतनपत्रक.
१४. संबंधीत रुग्णालयाचे इमर्जन्सी सर्टीफीकेट.
१५. रुग्णालयातील वास्तव्याचे प्रमाणपत्र.
१६. अवलंबिता प्रमाणपत्र (Dependent Certificate) सेवापुस्तिकेत उल्लेख असलेल्या पानाची छायांकित प्रत.
१७. पत्नी / पती / आई / वडील नोकरीत नसल्याचे प्रमाणपत्र // नोकरीत असेल तर वैद्यकीय खर्च प्रतीपूर्ती प्रस्ताव दाखल न केल्याबाबत / अवलंबिता निवृत्तीवेतनधारक असेल तर कोषागाराचे प्रमाणपत्र
१८. मर्यादित कुटुंब प्रमाणपत्र.
१९. देयकामध्ये नर्सींग चार्जेस लावले असल्यास रुग्णालयाचे प्रमाणपत्र.
२०. अल्कोहोल आणि टॉनिक बाबत प्रमाणपत्र.
२१. मुख्यमंत्री / प्रधानमंत्री निधी, विमा कंपनी किंवा इतर संस्था यांच्याकडून आर्थिक सहाय / अग्रीम न घेतल्याबाबत प्रमाणपत्र तसेच रक्कम स्विकारल्याची पावती.
२२. अपघात झाला असल्यास दावा दाखल केल्याचे प्रमाणपत्र तसेच एफ. आय. आर. ची प्रत.
२३. प्रस्ताव विहीत कालावधीत सादर केल्याचे प्रमाणपत्र.
२४. वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती स्वत:ची असल्यास रजा मंजूरीचे आदेश प्रमाणपत्र.
२५. अग्रीम न घेतल्याचे प्रमाणपत्र.
२६. रक्कम नामंजूर झाल्यास एकरक्कमी परत करण्याबाबतचे हमीपत्र.
२७. खर्चाची देयके.
२८. प्रस्तावाची एकूण रक्कम.
२९. नादेय रक्कमांची यादी.
३०. सेवार्थ / पॅन / आधार झेरॉक्स.
३१. अर्जदाराने सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति महाविद्यालयात जमा केल्या असल्याचे व त्याबद्दल खात्री केल्याचे प्राचार्यांचे प्रमाणपत्र.
क्रमांक अर्ज भरण्याच्या सूचना
१. कृपया तारांकित (*) असलेला सर्व अनिवार्य तपशील भरा.
२. अपलोड करण्याची फाईल ही pdf फॉरमॅट मध्ये असावी आणि फाईल size ही 20 mb पेक्षा कमी असावी.
३. File Choose केल्यानंतर बटन दाबून अपलोड करावी.
५. अर्जाचा फॉर्म वेगवेगळ्या Section मध्ये विभागलेला आहे. (उदा. कर्मचारी तपशील,वैद्यकीय देयकाची प्राथमिक माहिती,रुग्णालय तपशील,आवश्यक कागदपत्रे.)
६. एक Section भरल्यानंतर, कृपया बटणावर क्लिक करा.
७. मागील विभागाचे तपशील तपासण्यासाठी, कृपया बटणावर क्लिक करा.
८. जर एखाद्या कर्मचाऱ्याला एकापेक्षा जास्त अर्ज करायचे असतील तर प्रत्येक नवीन अर्जासाठी "नवीन अर्ज" वर जाणे आवश्यक आहे.
९. जर एखादी व्यक्ती विशिष्ट Section (उदा. कर्मचारी तपशील) भरल्यानंतर लॉग आऊट झाली, तर त्या व्यक्तीने उर्वरित अर्ज भरण्यासाठी "वैद्यकीय प्रस्तावाची स्थिती " येथे जाणे आवश्यक आहे.